भाविकांच्या भक्तिरसात न्याहले प्रतिपंढरपूर; वाळूज येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी

Foto
औरंगाबाद :  छोटे पंढरपूर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या वाळूज येथील विठ्ठल मंदिरात पहाटे  खनिकर्म राज्यमंत्री अतुल सावे यांनी सपत्नीक पूजा केली त्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर उघडे करण्यात आले.आज सकाळी पासूनच जिल्ह्यातील विविध भागांतील दिंडी आणि पालखीचे आगमन प्रति पंढरपुरात होत आहे.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे दैवत म्हणून प्रचलित असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या पंढरपूर प्रमाणेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्रीक्षेत्र छोट्या पंढरपूराची ओळख प्रति पंढरपूर म्हणून  आहे. यामुळे दरवर्षी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी या पवित्र धार्मिक स्थळाला उसळते.

गतवर्षाप्रमाणेच यंदाही  भाविकांची छोट्या पंढरपुरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये आषाढी एकादशीं यात्रेचे औचित्य साधून राज्यमंत्री अतुल सावे व त्यांच्या पत्नी या दाम्पत्याच्या हस्ते प्राथमिकी विधीवत पूजन करण्यात आले व यानंतर विठल-रुख्मिणी मूर्तीस दुगधभिषेक आणि जल अभिषेक करण्यात आला. मान्यवर आणि पुजारी यांच्या हस्ते वस्त्र परिधान करून श्रुंगार-मुकुट चढविल्यानंतर  आरती संपन्न होताच मंदिरातील घंटानाद करून भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे प्रवेश द्वार खुले करण्यात आले. 

भाविकांना अनेक सेवाभावी संस्था, मित्र मंडळ आणि दानशूर व्यक्तीकडून साबुदाणा खिचडी, चहा, नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,या यात्रेतील भाविकांच्या देखरेखीसाठी पोलीस, व्हिडिओ कॅमेरे,  सीसीटीव्ही कॅमेरे आदींसह ट्राफिक पोलीस विभाग, गुन्हे शाखा विभाग, विशेष शाखा, क्यूआरटी चे पथक,  आणि खासगी सुरक्षा रक्षकासह मंदिर संस्थानचे शेकडो स्वयंसेवक आदींचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याच बरोबर भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी 108 शासकीय रुग्णवाहिका,आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी ही भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती मंदिराचे ट्रस्ट चे अद्यक्ष  राजेंद्र पवार यांनी दिली.

रुख्मिनी आणि पांडुरंगाची भेट झाल्याची अख्ययिका...
त्रेता युग संपल्यावर कलयुगाला सुरुवात होत असताना पंढरपुरात भगवंत अवतार घेणार असल्याने रुख्मिनी माता रुसून गेल्या होत्या. त्यांच्या शोधात पांडुरंग औरंगाबादेतील पंधरपुरात आले होते.या ठिकाणी दोघांची भेट झाली होती.काहीकाळ या ठिकाणी पांडुरंगाचे वास्तव्य होते.त्या नंतर त्यांनी मोठ्या पंधरपूरकडे प्रस्थान केले होते अशी आख्यायिका प्रचिलीत आहे.यामुळे या मंदिराला मोठे महत्व आहे. अशी माहिती मंदिराचे पुजारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली.

रस्त्यावर शेकडो दिंड्या... 
 औरंगाबाद ते पंढरपूर रस्त्यावर ठीक ठिकाणी दिंड्या पंढरपूर कडे जात आहेत तर हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी सह परिवार जाताना दिसत आहे. या वर्षी 5 लाख भाविक पंढरपुरात दाखल होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

दिंड्या पालख्याचे आगमन सुरू.....
आषाढी एकादशीनिमित्त रात्री बारा वाजेपासूनच  जिल्ह्यातील विविध गावातून दिंड्या,आणि पालखी निघतात या पालख्या मध्ये आबाल वृद्ध, महिला चा समावेश असतो या दिंड्या सकाळपासूनच विठ्ठलाच्या गजरात पंढरपुरात दाखल होत आहे.यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker